शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कापूस, कांदा, सोयाबिन बाबत केंद्राचा मोठा निर्णय 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कांदा निर्यातीवरील किमान शुल्क हटवण्यात आले असून यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यामुळे कांदा निर्यातीत वाढ होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यात आली होती पण निर्यात शुल्कामुळे शेतकरी अडचणीत होते. यानंतरच किमान निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेण्याची केंद्राला विनंती केली होती असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना म्हटलं की, पंतप्रधान मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी कच्च्या तेलावर कुठलीही आयात ड्युटी नव्हतं, 20 टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि रिफाइंड तेलावर साडेबारा टक्क्यावरून साडे बत्तीस टक्के करण्यात आला आहे, त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्याला प्रचंड मोठा फायदा होणार आहे.

सोयाबीनच्या किमती बाजारात वाढण्याकरिता त्याचा मोठा फायदा होणार आहे. सोयाबीनच्या खरेदीचा निर्णय केंद्राने घेतला आहे त्यामुळे सोयाबीनच्या शेतकरी त्या ठिकाणी निर्णयामुळे होणार आहे. कापसाच्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा मिळणार आहे. कांद्यावर एक्सपोर्ट ड्युटी 40% वरून 20 टक्क्यावर आणली आहे.

त्यामुळे कांद्याचे भाव स्थिर होण्याकरिता वर जाण्याकरिता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे. बासमती राईसच्या एक्सपोर्टवर जी ड्युटी होती त्या ठिकाणी काढण्यात आली आहे त्यामुळे बासमती धान पिकवणारा शेतकरी यालाही खूप फायदा होणार असल्याचंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Comment