मोठी बातमी! दोन दिवसांनी मुख्यमंत्री राजीनामा देणार, राजकीय वर्तुळात खळबळ

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची काही दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून सुटका झाली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी रविवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली असून त्यांनी पुढील दोन दिवसात आपण राजीनामा देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीच्या आम आदमी पार्टीच्या मुख्यालयात आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी आपण दोन दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हंटले. जो पर्यंत जनता त्यांचा निर्णय देत नाही, तो पर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही असे म्हटले आहे. केजरीवाल म्हणाले, ‘मी प्रत्येक घर आणि गल्लीबोळ्यात जाईन. जोपर्यंत जनतेचा निर्णय मिळत नाही तो पर्यंत मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसणार नाही’.

Leave a Comment