येत्या काळात पाऊस कसा असेल?, पंजाबराव डख यांनी सांगितलाय अंदाज

सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर आपण आहोत. सध्या काही भागात पावसाने विश्रांती घेतलीय. तर कुठे रिमझिम पाऊस पडतोय. अशात आता येत्या काळात पाऊस कसा असेल? याबाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढचे पाच ते सहा दिवस हवामान कोरडं राहणार आहे. 20 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रभरात कोरडं हवामान राहील. या काळात पावसाने विश्रांती पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र मुसळधार पाऊस कोसळणार आहे.

बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर 21 तारखेनंतर पुन्हा एकदा राज्यात पाऊस बरसायला होणार आहे. 21 सप्टेंबरपासून चांगला पाऊस होण्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. 21 सप्टेंबरपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे.

Leave a Comment