पारनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्याच्या पठार भागाला एक टीएमसी पाणी मिळावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी, डिंबे – माणिकडोह बोगद्याचे काम त्वरित सुरू करावे अशा विविध मागण्यासंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर, राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे, संघटक बाळशिराम पायमोडे यांनी २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणावर ठाम असल्याचा निर्णयच उपोषणकर्त्यांनी घेतलाय.
दरम्यान उपोषणाला पाच दिवस उलटून गेले तरीही अद्यापही प्रशासनाला जाग आलेली नाही. तसेच प्रशासनाचा एकही अधिकारी उपोषणस्थळी फिरकला देखील नाही. त्यामुळे उपोषण लांबणार असल्याची चिन्हे दिसत आहे. मात्र उपोषणकर्त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने प्रकृती काहीसी खालावली आहे. प्रशासनाने अद्यापही उपोषणाकडे लक्ष न दिल्याने आता शेतकरी संतप्त होताना दिसत आहे. तसेच रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान उपोषणाच्या सहाव्या दिवशी रयत शेतकरी संघटनेच्यावतीने जाहीर पाठिंबा दिला आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कार्याध्यक्ष सुनिता जाधव यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसेच जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले.
यावेळी सुनिता जाधव म्हणाल्या की, गेल्या सहा दिवसांपासून पाणी प्रश्नासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर, राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे, संघटक बाळशिराम पायमोडे हे उपोषणाला बसले आहे. तसेच या उपोषणाकडे प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही. पाणी प्रश्न जिव्हाळ्याचा विषय असून यासाठी जनतेने पेटून उठले पाहिजे. लवकरात लवकर उपोषणकर्त्यांच्या मागण्या प्रशासन, शासनाने तातडीने मान्य करा अन्यथा रयत शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

Must be Agressive