तर “या” कार्यालयाला बांगड्यांचा आहेर भेट देणार, सुनिल इघे आक्रमक

संगमनेर (DSNews24) तालुक्यातील साकूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल इघे यांनी विविध मागण्यांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. तसेच येत्या १५ दिवसांत मागण्या मार्गी न लावल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला बांगड्यांचा आहेर भेट देऊन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

नेमक्या काय आहेत मागण्या
साकूर ते जांबुत स्पीड ब्रेकर काढावे, साकूर जवळील माऊली घाटातील अवघड वळण सरळ करण्यात यावे, साकूर येथील जिल्हा परिषद शाळेसमोर स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे, तसेच चिंचेवाडी ते डोंगरेवस्ती रस्ता रूंदीकरण करण्यात यावा. या सर्व मागण्या तातडीने मान्य करून मार्गी लावण्यात याव्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment