नगरजवळ भीषण अपघात ; ३ जण जागीच ठार

नगर मनमाड महामार्गाजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.आयशर टेम्पो, ट्रक व पिकअपचा भीषण अपघात होवून पिकअपमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. काल (मंगळवार) रात्री 11 वाजेच्या सुमारास नगरजवळील निंबळक बायपास रोडवर ही घटना घडली.

दरम्यान या अपघातात सुमारे आठ ते 10 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाबासाहेब नामदेव जठार (वय 44), महेश बाबासाहेब खैरनाथ (वय 30, दोघे रा. येवला, जि. नाशिक) व आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.

निंबळक बायपास रोडचे काम सुरू असल्याने एका बाजूनेच वाहतूक सुरू असून दुसरी बाजू वाहतूकीसाठी बंद करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री या रोडवरून जाणाऱ्या पिकअपला आयशर टेम्पो व ट्रकने पाठीमागून जोरात धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला.

Leave a Comment