गिरीश बापटांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले…..

लोकसभा खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट(Girish Bapat) यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मल्लिक यांनी त्यांच्या निधनाला माहिती दिली. गिरीष बापट गंभीर आजाराने त्रस्त होते.गेल्या दीड वर्षांपासून ते आजारी होते.

त्यांचे आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस होत असे. गिरीश बापट यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान गिरीश बापट यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत आही. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी देखील गिरीश बापट यांच्यासोबतचा एक जुना फोटो ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, गिरीश बापट यांनी महाराष्ट्रात भाजपच्या उभारणीत आणि पक्ष मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आमदार असताना त्यांनी लोककल्याणाचे प्रश्न मांडले. प्रभावी मंत्री आणि नंतर पुण्याचे खासदार म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला.त्याचे चांगले कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील.

बापटजी हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते त्यांनी समाजाची तळमळीने सेवा केली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आणि विशेषत: पुण्याच्या विकासासाठी ते नेहमी समोर असायचे, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

Leave a Comment