नगर हादरले…. पत्नीचा खून करून बनाव करणाऱ्या पतीला ठोकल्या बेड्या

राहुरी : पती-पत्नीच्या वादातून पतीने पत्नीची हत्या केली. उर्मिला केशव लगे (वय 35) हिच्या खून प्रकरणी पोलिसांनी तिचा पती केशव श्रीराम लगे यास अटक केली.

आरोपीने पोलिसांनी चकवा देण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आज सकाळी 5.20 चे सुमारास केशव श्रीराम लगे हा पोलीस स्टेशनला आला. पत्नी ही बेडरूममध्ये बेशुद्ध किंवा मृत अवस्थेत पडली आहे. राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांनी खात्री केली असता उर्मिला लगे ही डोक्यावर जखम झालेली व हात फ्रॅक्चर झालेल्या अवस्थेत मृत झालेली असल्याचे दिसून आले.

मृत महिलेचा भाऊ मयूर कचरू गाडेकर (माळीचिंचोरा ता. नेवासा ) यांच्या फिर्यादीवरून बहीण उर्मिला लगे हिचेसोबत पती केशव लगे याचे नेहमीच भांडण होत होते. यापूर्वी रक्षाबंधनच्या वेळी तसेच इतरही वेळी झालेले भांडणात नातेवाईकांमार्फत पतीला समज देण्यात आलेली होती.

नेहमीच्या होणाऱ्या भांडणातूनच काल रात्री बारा साडेबारा दरम्यान केशव श्लगे याने उर्मिला केशव लगे हिचा टणक हत्याराचा वापर करून डोक्याला व शरीरावर ठिकठिकाणी जखमा करून हात फ्रॅक्चर करून खून केला, अशा आशयाची तक्रार दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंगळे, पवार , परदेशी, पोलीस उपनिरीक्षक खोंडे ,पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस हवालदार वैराळ, ठाणगे, शकुर सय्यद, डीबी पथकाचे पोलीस हवालदार सुरज गायकवाड, नदीम शेख, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले ,सतीश कुराडे , गोवर्धन कदम, सचिन ताजने, संतोष राठोड ,गणेश लिपणे ,रवी पवार, योगेश आव्हाड, रिजवान शेख, महिला पोलीस कॉन्स्टेबल मीना नाचन तपास करत पती केशव श्रीराम लगे यास तत्काळ अटक केली. लोखंडी राँडने मध्यरात्री त्याने पतीची हत्या केली.

रात्री झालेला वाद कुटुंबातील सदस्यांनी मिटवला होता.पण मध्यरात्री बेडरूममध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाले.

Leave a Comment