दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्र सरकार खाऊन पिऊन आले पण बिलं उधार ठेवून आलेत. आता उधारी देत नाहीत म्हणून तिथल्या कंपनीने राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अशा दळभद्रीपणामुळे आंतराष्ट्रीय गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या दावोस समिट सारख्या मंचावर महाराष्ट्राची बदनामी होऊ शकते, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर केली होती.
याबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला माहिती नव्हतं की रोहित पवार आता हॉटेलचे बिल देखील पाहत आहेत. मीच त्यांना ही सर्व बिल पाठवून देतो असं म्हणत राधाकृष्ण विखेंनी रोहित पवारांना टोला लगावला आहे.

तुम्ही तरी काय केलंय?
वडील कुठे होते आणि तुम्ही तीन पक्ष बदललेत?
खरं आहे ना?