मेष : एखादी गुप्त वार्ता समजेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कर्क : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
सिंह : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कन्या : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्द वाढेल.
तूळ : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
वृश्चिक : आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी व आशावादी राहील.
धनू : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
कुंभ : कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.
मीन : धार्मिक कार्यात सहभाग होईल. भाग्यकारक घटना घडेल.
