आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

वृषभ : भागीदारी व्यवसायात सुसंधी लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

मिथुन : वेळ वाया जाण्याची शक्यता. हितशत्रूंवर मात कराल.

 

कर्क : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

सिंह : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

कन्या : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

 

तूळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल.

 

वृश्‍चिक : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

धनू : वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

 

मकर : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

मीन : गुरुकृपा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Leave a Comment