बुधवार दि.९ ते रविवार दि.१३ ऑक्टोबरपर्यंतच्या पाच दिवसाच्या पूर्वघोषित पहिल्या आवर्तनातही संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेषतः बुधवार व गुरुवार दि. ९ व १० ऑक्टोबरला दोन दिवस संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात तर गुरुवार, शुक्रवार दि १० व ११ ऑक्टोबरला दोन दिवस, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १० जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाडा क्षेत्रात मात्र तुरळक ठिकाणी गडगडाटीसह केवळ किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
