भाजपला मोठा धक्का, प्रदेशाध्यक्षांचा पराभव 

नवी दिल्ली – हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी  काही दिवसांपूर्वी मतदान झाले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरु झाली होती असून दोन्ही राज्यांतील निकाल हाती आले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार हरियाणात भाजपने (BJP) बहुमताचा आकडा गाठला आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने (Congress) बहुमताचा आकडा पार केला आहे. अशातच आता जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे.

भाजपाचे जम्मू-काश्मीर प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना (Ravindra Raina) यांचा नौशेरा मतदारसंघात पराभव झाला आहे. त्यांचा नॅशनल कॉन्फरन्सच्या सुरिंदर चौधरी यांनी ७ हजार ८१९ मतांनी पराभव केला आहे.त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

२०१४ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या निवडणुका झाल्या तेव्हा भाजपने पीडीपीसोबत सरकार स्थापन केले होते. पण पीडीपीला दिलेला पाठिंबा काढून घेत भाजपने तेथील सरकार पाडले होते. त्यानंतर अनेक वर्ष जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या नव्हत्या.२०१९ साली ३७० कलम हटवल्यानंतर यंदा प्रथमच काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. मात्र,या निवडणुकीत भाजपला फटका बसल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment