Breaking… अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराबाबत नवीन मोठी अपडेट समोर

अहमदनगर शहर व जिल्हा या दोन्हीचे नामांतर होत असल्याचे आता स्पष्ट झालं आहे. अहमदनगर शहराचे आणि जिल्ह्याचे नाव अखेर “अहिल्यानगर” होणार असून यासाठी आता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन राजपत्रात याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे.

महाराष्ट्र सरकारने आता राजपत्र जारी केल्यामुळे अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यात कोणताही अडथळा राहिलेला नाही. अहमदनगर शहराचेच नाही तर जिल्ह्याचे नाव ही आता यापुढे “अहिल्यानगर” असे होणार असून याबाबत राजपत्रांमध्ये तसा उल्लेख करण्यात आला आहे.

या आधी केवळ शहराचे नाव अहिल्यानगर करण्याबाबत अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र, आता जिल्ह्याचे नाव देखील अहिल्यानगर करण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून असलेला शहर व जिल्हा नामांतराचा गोंधळ आता संपुष्टात आला आहे

Leave a Comment