नांदेड : भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांची तब्येत खालावली असून त्यांना नांदेड विमानतळावरून एअर ॲम्बुलन्सने उपचारासाठी मुंबईकडे हलवण्यात येणार असल्याची माहिती आहे. आमदार मुटकुळे यांच्यावर काही दिवसापूर्वी एन्जोप्लास्टी झाली होती.
श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना तातडीने मुंबईला हलवण्यात येत आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकांसाठी त्यांची तयारी सुरू असून यंदा त्यांच्या मुलाला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. मात्र, आज अचानक त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईकडे हलविण्यात आला आहे.
तानाजी मुटकुळे हे हिंगोली विधानसभेचे भाजपाचे आमदार आहेत आहेत. हिंगोलीवरून आमदार तानाजी मुटकुळे यांची रुग्णवाहिका नांदेड विमानतळावर दाखल झाली आहे. आता, येथून मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी त्यांना नेण्यात येणार आहे.
