संगमनेर(DSNews24) तालुक्यातील साकूर येथील माजी उपसरपंच दादा अब्दुल पटेल यांचं हृद्यविकाराच्या तिव्र धक्याने निधन झाले आहे. ते साकूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य देखील आहे. तसेच मुस्लिम जमात ट्रस्टचे माजी अध्यक्ष होते. दादा पटेल यांच्या अचानक निधनामुळे पठार भागात एकच धक्का बसला आहे. दादा पटेल यांची पठार भागात एक वेगळीच ओळख होती. मात्र त्यांच्या निधनाने साकूरवर शोककळा पसरली आहे.
