पारनेर विधानसभेसाठी इच्छुक कोण?, कशी होऊ शकते निवडणूक….

पारनेर : लोकसभेत निलेश लंके यांनी मोठा विजय मिळवल्यानंतर पारनेर विधानसभेची जागा रिक्त झालीय. आता याच जागेसाठी महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. राणी लंके यांची लोकसभा निवडणुकीसाठीही चर्चा होती. परंतु त्यात त्यांनी संधी मिळाली नाही. अशातच आता पुन्हा एकदा राणी लंके यांची चर्चा सुरू झालीय. तर त्यांच्या अजितदादांनी निलेश लंके यांचाच जवळच्या व्यक्ती शोधला आहे. त्यामुळे यंदा पारनेरमध्ये मोठी लढत बघायला मिळण्याची शक्यता आहे.

महायुतीत पारनेर विधानसभेची जागा ही अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाकडून यावेळी काशिनाथ दाते, विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात, सुजित झावरे, प्रशांत गायकवाड यांची नावे समोर येत आहेत. परंतु त्याचवेळी पारनेरमध्ये नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी देखील सुरू केली आहे. विजय औटी यांची खासदार निलेश लंके यांचा अत्यंत विश्वासू नेता म्हणून ओळख होती. परंतु राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर त्यांनी अजित पवारांची साथ दिली. आता पारनेरमधून अजित पवार त्यांना उमेदवारी देणार असं बोललं जात आहे.

दरम्यान, अजित पवार गटातील सुजित झावरे यांनी विखे यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी विखे यांच्याबरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनीही विधानसभेची इच्छा बोलून दाखविलीय. त्यामुळे अजित पवार गटाकडून त्यांनाही संधी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यातच शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते माजी सभापती काशिनाथ दाते यांनीही विखेंना मोठी मदत केलीय. त्यांनीही उमेदवारी मिळवण्यासाठी विखेंकडे प्रयत्न सुरू केले आहेत.

यातच महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे पारनेर तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छूक आहेत. तालुक्याचे चित्र असे असले तरी आगामी काळात कोणत्या पक्षाची कोणासोबत आघाडी किंवा युती होणार ? यावर राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत. त्याचबरोबर आयत्यावेळी पारनेर तालुक्यातील नवीन चेहरा ही अचानक समोर येऊ शकतात. अशीही चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

Leave a Comment