पारनेर ब्रेकिंग! दाते, झावरे, औटी, लामखडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

पारनेर (DSNews24/किरण पुरी) निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. तसेच कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरणार याचीच उत्सुकता लागली आहे.

अशातच पारनेरमधून एक मोठी बातमी समोर आलीय. खासदार निलेश लंके यांच्या विरोधात विरोधाकांनी एकजूट केल्याच बघायला मिळाले आहे. नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पारनेरमधील काही नेत्यांनी प्रवेश केला आहे. 

जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, माजी उपनगराध्यक्ष विजय औटी, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, शिवाजीराव गुजर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Leave a Comment