आमदार सतीश चव्हाण यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan)यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे.
चव्हाण (दि.18) दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे दाखल झाले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
१५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका छत्रपती संभाजीनगरचे आमदार सतीश चव्हाण यांनी घेतली होती. वास्तविक सर्व समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारच्या कार्यकाळात घेतलेली आहे. असे असताना आमदार सतीश चव्हाण यांनी जाणीवपूर्वक शिस्तभंग करण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सुनिल तटकरेंनी म्हटले आहे.
