मेष : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
वृषभ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
कर्क : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.
कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
तूळ : राजकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. कार्यक्षेत्र वाढणार आहे.
वृश्चिक : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मकर : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही.
मीन : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
