राज्यात पावसाचा कसा आहे अंदाज, वाचा….

पुणे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दाना चक्रीवादळचा परिणाम म्हणून राज्याच्या चारही उपविभागांमध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील तीन दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आज काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

विदर्भातसुद्धा आजपासून तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील चार दिवस विदर्भातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचसोबत कोकण, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील. या पावसामुळे या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावासामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment