नगर : राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासमवेत बाजीराव गवारे, काशिनाथ लवांडे, सुभाष पाटील, बाळकृष्ण बानकर, धनराज गाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. राहुरी मतदारसंघातून कर्डिले चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत.
भाजपची उमेदवारी त्यांनाच पुन्हा मिळाली असून कर्डिले समर्थकांचा उत्साह यंदा शिगेला पोहचल्याचे पहायला मिळत आहे. 2019 च्या निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठील कर्डिले समर्थकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला खिंडार पाडत अनेक दिग्गजांनी भाजपत प्रवेश केला आहे.
सोमवारी किंवा मंगळवारी महायुती घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत पुन्हा अर्ज दाखल केला जाणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे
