Maharashtra Weather : हवामान विभागाचा नवा अंदाज, नगरसह ‘या’ जिल्ह्यांत पुढील ५ दिवस…..

Maharashtra Weather : राज्यात आजपासून पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण राहिल. तसेच काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

6 एप्रिल ते 9 एप्रिल या दरम्यान सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भातील बुलडाणा, वर्धा आणि नागपूर हे जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकणातील चार जिल्हे यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात वातावरणात बदल दिसून येईल.

दरम्यान, 2 एप्रिलपासून दुपारच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या 15 दिवसापर्यंत म्हणजे 15 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेय.

मात्र, हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरला आहे. अनेक राज्यांमध्ये गारपिटीमुळे गहू व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पिके पक्व होण्यासही उशीर झाला आहे.

Leave a Comment