संगमनेर – साकूर बस प्रवासात महिलेसोबत घडल अस काही….

संगमनेर शहरातील बस स्थानकातून संगमनेर ते पिंपळगाव देपा दरम्यान प्रवास करताना पंचेचाळीस वर्षीय महिलेचे अंदाजे एक लाख वीस हजार रुपये किमतीचे चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना मंगळवार दि. २८ मार्च रोजी तीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली आहे.

मंगळवारी तीन वाजेच्या दरम्यान घरकाम करणारी पंचेचाळीस वर्षीय महीला कविता सुरेश साळुंखे या आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी पिंपळगाव देपा येथे जाण्यासाठी संगमनेर स्थानकात आल्या असता बस स्थानकात खूपच गर्दी होती. तर त्यांनी संगमनेर ते साकुरला जाणारी बस पकडली.

बस मध्ये देखील मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत तसेच संगमनेर ते पिंपळगाव देपा प्रवासा दरम्यान अज्ञात चोरट्याने पर्सची चैन खोलून त्यात ठेवलेले अंदाजे एक लाख वीस हजार रुपये किमतीचे चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने चोरी केले आहे.

याप्रकरणी घारगाव पोलिस स्टेशनला संगमनेरातील मालदाड येथील सार्थक कॉलनीतील रहिवासी कविता सुरेश साळुंखे यांचे फिर्यादी नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

या दरम्यान संगमनेर बस स्थानक परिसरात सोन साखळी चोरांची संख्या वाढली असून महिलांचे गळ्यातील मनी मंगळसूत्र तसेच मौल्यवान वस्तूंची चोरीच्या घटनांनमध्ये वाढ होत आहे. राज्य सरकारने महिलांना बस प्रवासात पन्नास टक्के सूट जरी दिली असली तरी चोरांच्या भीतीने बसचा प्रवास महिलांना असुरक्षित झाला आहे का? असाही प्रश्न यानिमित्ताने महीला वर्गातून उपस्थित होत आहे. तरी पोलिस प्रशासनाने चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.

Leave a Comment