संगमनेर – धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी आयोजित केलेल्या युवा संकल्प मेळाव्यात विखे समर्थक असलेले वसंतराव देशमुख यांनी कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.
भर सभेत आमच्या बहिणीवर शिंतोडे, प्रचाराला बाहेर कशी पडते ते पाहू अशी धमकी, लाडकी बहीण म्हणून मतांसाठी खोटे कौतुक आणि थेट जयश्री थोरात यांच्याबद्दल खालच्या थराची भाषा, भाजपाचे हे ढोंग जनतेला स्पष्ट दिसतंय अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली.
