संगमनेरमध्ये (Sangamner) झालेल्या हिंसक प्रकरणाबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. संगमनेरमध्ये काल झालेल्या गदारोळ आणि त्यानंतर झालेल्या जाळपोळ आणि तोडफोड प्रकरणी केंद्राने दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्रालयाकडून माहिती घेतली आहे.
आता या प्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील या प्रकरणाची दखल घेत दूरध्वनी वरून प्रकरणाची माहिती घेतल्याची माहिती पुढे आली आहे. अशातच वसंतराव देशमुख यांनी बोलताना मर्यादा राखावी, महायुती अडचणीत येईल असे भाष्य करू नये. असेही अजित पवारांनी सूचना केल्याची माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुजय विखे यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अजित पवार यांनी सुजय विखे यांची या वक्तव्या प्रकरणी कानउघडणी केल्याचे समजते. महायुतीला अडचणी निर्माण होतील असं कुठंलही वक्तव्य न करण्याची सूचना देखील अजित पवार यांनी सुजय विखेंना केली आहे.
