वसंतराव देशमुख कॉंग्रेसचे, अर्ध्यातासात थोरातांचे गुंड कसे आले?, मंत्री विखे पाटील 

संगमनेर – भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या धांदरफळ येथील सभेतून भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं. त्यानंतर थोरातांच्या कार्यकर्त्यांनी सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. दरम्यान आज संगमनेरमध्ये बोलताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार निशाणा साधलाय. तसेच बाळासाहेब थोरात यांना थेट इशारा दिला आहे. घटनेचं राजकारण करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. गुन्हा दाखल करा मागणीसाठी तुम्हाला पोलीस ठाण्यात बसावं लागतंय. मात्र आपलं ठेवायचं झाकून दुसर्‍याच पाहायचं वाकून… असं संगमनेरचं नेतृत्व आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

वसंतराव देशमुख यांच्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिलंय. महिलांबाबत अवमानकारक भाषण करणे चुकीचे आहे. वसंत देशमुख काँग्रेसचे सदस्य, पक्षाने कारवाई करावी. देशमुख बोलले यामागे राजकीय षडयंत्र आहे. अर्ध्यातासात थोरातांचे गुंड कसे आले? थोरातांचा पीए , त्यांचे भाऊ इंद्रजीत थोरात त्यात होते. तुमचा पर्दाफाश झालाय. सुजयवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. महिला , कार्यकर्त्यांना मारहाण झाली. याची चौकशी व्हायला पाहिजे. मास्टरमाईंड कोण याचा शोध घ्यावा लागेल, असं राधाकृष्ण विखे म्हणालेत.

दांडकाई करणाऱ्यांना, वाळूवाल्यांना तुम्ही घाबरला का? मग का तुम्ही निषेधाचे बोर्ड लावले नाही. राजकीय दहशतवाद इथे निर्माण केला जातोय. स्वतःला सुसंस्कृत म्हणवणाऱ्यांची इथे पिलावळ आहे, असे म्हणत विखे पाटील यांनी काँग्रेस बाळासाहेब थोरातांवर टीका केली.

उमेदवार कोणताही असो युती म्हणून भूमिका घ्या. दहशतवादाविरोधात आपली लढाई आहे. संगमनेर विधानसभेत उमेदवार कोण हे पाहू नका. वसंतराव देशमुख यांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही. त्याचा निषेध मी केलाय. मात्र पंधरा मिनिटात मारणारे कसे जमा होतात? हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुजय विखेच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांवर केली.

निवडणुकीची गावपातळीवर तयारी करा. दडपशाही गाडण्यासाठी परीवर्तन गरजेचं आहे. गावागावात जावून सांगा, टायगर अभी जिंदा है… तालुक्यातील दहशत आता संपवावी लागेल. आमच्या मतदारसंघात येऊन शिव्या देणं तुमचं चालतं. हाच का तुमचा सुसंस्कृतपणा? आमचं नाही तर तुमचं दहशतीचं झाकण उडवावं लागेल. यांचा खरा दहशतवादी चेहरा समोर आला. तुम्ही यंदा सामान्य माणसाच्या नादी लागला आहात. आता गाठ आमच्याशी आहे, असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांना दिला आहे.

तसेच शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचा सन्मान करणारं महायुतीचं सरकार आहे.केवळ घोषणा देऊन मतं मिळत नाही. सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं काम सरकारने केलंय. सबका साथ सबका विकास हे आमचे ध्येय आहे. त्याची प्रचिती आता यायला लागलीय. तिसऱ्यांदा मोदींना लोकांनी पंतप्रधान केलं. बदलापूर आणि संगमनेरसह इतर ठिकाणी घडलेल्या घटनेला आघाडी जबाबदार आहे. महा युतीला बदनाम करण्याचं काम सध्या सुरू आहे, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

Leave a Comment