राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने आज (दि.२८) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी चौथी जाहीर केली. शरद पवार यांच्या पक्षाने चौथ्या यादीत एकूण ७ जणांना संधी दिली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ साठी एकूण ४ यादी जाहीर केल्या. यामध्ये पहिल्या यादीत (दि.२४ ऑक्टो.) ५४ उमेदवार, दुसऱ्या यादीत (दि.२६ ऑक्टो.) २२ उमेदवार, तिसऱ्या यादीत (दि.२७ ऑक्टो.) ९ तर अंतिम चौथ्या यादीत ७ नावांची घोषणा करण्यात आल्याचे पक्षाने प्रेसनोटमध्ये स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने आज (दि.२८) ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. मतदारसंघ आणि उमेदवार पुढील प्रमाणे : माण- प्रभाकर घार्गे, काटोल – सलील अनिल देशमुख, खानापूर-वैभव सदाशिव पाटील, वाई- अरूणादेवी पिसाळ, दौंड-रमेश थोरात, पुसद-शरद मैंद तर सिंदखेडा-संदीप बेडसे.
