मोठी बातमी! भाजपची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर 

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची (BJP) तिसरी यादी (List) जाहीर करण्यात आली आहे. याआधी ९९ उमेदवारी पहिली तर २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता भाजपकडून २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे आतापर्यंत १४६ जागांवर उमेदवार घोषित झाले आहेत.

या यादीत माळशिरस-राम सातपुते, वर्सोवा- भारती लव्हेकर, तिवसा-राजेश वानखेडे, आर्वी- सुमित वानखेडे, मोर्शी-उमेश यावलकर, नागपूर उत्तर -मिलिंद माने, साकोली-अविनाश ब्राह्मणकर, सावनेर-आशिष देशमुख, चंद्रपूर-किशोर जोरगेवार, घाटकोपर पूर्व-पराग शहा, कराड उत्तर-मनोज घोरपडे, मूर्तिजापूर-हरीश मारोतीअप्पा पिंपळे, कारंजा-साईप्रकाश डहाके, काटोल-चरणसिंग ठाकूर, नागपूर मध्य-प्रवीण दटके, लातूर शहर-अर्चना पाटील चाकूरकर, नागपूर पश्चिम -सुधाकर कोहळे, वसई-स्नेहा दुबे, आर्णी-राजू तोडसोम, देगलूर-जितेश अंतापूरकर, डहाणू-विनोद मेढा, बोरवली-संजय उपाध्याय, आष्टी-सुरेश धस, पलूस कडेगाव-संग्राम देशमुख, उमरखेड-किशन वानखेडे यांचा सामवेश आहे.

दरम्यान, आतापर्यंत महायुतीमधील (Mahayuti) भाजपकडून १४६,शिवसेना (एकनाथ शिंदे) ६५ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) ४९ उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून आतापर्यंत १०० राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ७६ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ८५ उमेदवार घोषित केले आहेत. त्यामुळे महायुतीकडून २८८ पैकी २६० आणि महाविकास आघाडीकडून २६१ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत

Leave a Comment