संगमनेर – राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात हे मंगळवार दि. 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वा. संगमनेर प्रांताधिकारी कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
आमदार थोरात हे 1985 पासून संगमनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहे. मागील 8 वेळेस ते विक्रमी मताधिक्याने विजयी झाले असून, यावेळेस 9 व्या वेळेस विधानसभेचा अर्ज भरणार आहे.
आ. थोरात हे आपला उमेदवारी अर्ज मंगळवार दि. 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी दाखल करणार असून यावेळी खासदार नीलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा.आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, प्रभावती घोगरे, डॉ. जयश्री थोरात यांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे , आरपीआय व महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
अर्ज भरण्यासाठी संगमनेर तालुक्यातील सर्व युवक, नागरिक, महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ,आरपीआय व महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षांनी केले आहे.
