मेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैस वाया जाण्याची शक्यता.
वृषभ : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.
मिथुन : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
सिंह : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. जुनी येणी वसूल होतील.
कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
तुळ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृश्चिक : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
धनु : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
मकर : गुरूकृपा लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
मीन : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
