विधानसभेपूर्वी कॉंग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश 

विधानसभेच्या तोंडावर अनेक नेत्यांनी या पक्षातून त्या पक्षातून कोलांट्या उड्या मारल्या आहेत. यातच आता मुंबईतील काँग्रेसच्या बड्या नेत्यानं भाजपात प्रवेश केला आहे. हे काँग्रेसचे नेते सायन कोळीवाडा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते.

मात्र, तिकीट न दिल्यानं नाराज असलेल्या बड्या नेत्यानं भाजपात प्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे.

हे बडे नेते आहेत, मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ऐन विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना रवी राजा यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानं मोठा धक्का बसला आहे.

Leave a Comment