तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, मोठी अपडेट समोर…

राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. 26 नोव्हेंबरला सध्याची विधानसभा बरखास्त झाल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज दिवाळीचा सण आहे महाराष्ट्रात या वेळेला दिवाळी अधिक आनंदाने साजरी होईल. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नरकासुरांचा आवाज झाला पण तरी नरकासुर कुठे वळवत असतील.

तर या राज्याच्या मतदार राजा त्या वळवळणाऱ्या नरकासुराला त्याची जागा दाखवतील. जनतेला यापुढे महाराष्ट्रातला स्वाभिमानाने सुखाचे दिवस यावे यासाठी आमचे प्रयत्न राहतील महाविकास आघाडीचे आणि वातावरण अत्यंत पोषक आहे. कोणी काहीही म्हणू द्या. पुढल्या दिवाळीला या राज्यात महाविकास आघाडीच्या सरकार असेल आणि जनतेच्या मनात आनंद अधिक झालेला दिसेल, असं संजय राऊत म्हणालेत.

Leave a Comment