मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
मिथुन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.
कर्क : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
सिंह : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.
कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
तूळ : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील.
वृश्चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
धनू : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
मीन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
