माजी भारतीय क्रिकेटपटू सलीम दुरानी(Salim Durani) यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी गुजरातमधील जामनगर येथील त्यांच्या घरी निधन झाले.
ते कर्करोगाने त्रस्त होते. सलीम यांच्यावर जानेवारीमध्ये फ्रॅक्चरवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
1960 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारे दुरानी हे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते. त्यांनी भारतासाठी एकूण 29 कसोटी सामने खेळले, या कालावधीत त्यांनी 1 शतक आणि 7 अर्धशतकांसह 1202 धावा केल्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 755 विकेट्स घेतल्या आहेत.
