सूनेला बेडरूममध्ये सासूने बघितले “त्या” अवस्थेत, अन् पुढे….

छतरपूर : एका विवाहित महिलेला तिच्या सासूने शेजारच्या व्यक्तीशी रोमान्स करताना रंगेहाथ पकडले. ही गोष्ट पतीला समजू नये म्हणून महिलेनं प्रियकराच्या मदतीनं तिच्या सासूची हत्या केली; मात्र पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला असून महिलेला अटक करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातल्या छतरपूर इथल्या एका महिलेनं पती घराबाहेर जाताच असं काही कृत्य केलं, की त्यावर कदाचित विश्वास बसणार नाही. पती घराबाहेर पडताच तिनं तिच्या प्रियकराला घरी बोलावलं. तिचा प्रियकर तिच्या घराच्या शेजारी राहायचा. दोघांनी बेडरूमचा दरवाजा बंद करून रोमान्स सुरू केला. तेवढ्यात महिलेची सासू तिथे आली. तिनं हा प्रकार पाहताच तिला धक्का बसला.

घडलेला प्रकार पतीला समजू नये अशी भीती महिलेला वाटू लागली. त्यामुळे तिनं प्रियकराच्या मदतीनं सासूची हत्या केली. तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. मृतदेहाबाबत लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली. अटक केल्यावर महिलेनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. नंतर तिनं गुन्हा कबूल केला. पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला न्यायालयात हजर करून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे.

जुझार नगर पोलीस स्टेशन हद्दीतल्या कुरेरी गावात हा प्रकार घडला. तिथल्या लक्ष्मी सिंह (वय 24) या महिलेनं सोमवारी तिचा प्रियकर सचिनच्या मदतीने सासू सुनील सिंह (वय 45) हिची हत्या केली. या प्रकरणामुळे सुनीलचा मुलगा अंकुर सिंहला जबर धक्का बसला आहे. पत्नी प्रियकराच्या मदतीनं सासूची हत्या कशी करू शकते यावर त्याचा विश्वास बसत नाही. त्याने सांगितले की, ”मी काही वेळासाठी घराबाहेर गेलो होतो. पत्नीला आईकडे लक्ष देण्यास सांगितलं होतं; पण तिनं माझ्या आईची हत्या केली.”

हत्येनंतर सचिन आणि लक्ष्मीने महिलेचा मृतदेह जंगलात फेकून दिला. काही तासांनी तिथून जाणाऱ्या लोकांनी मृतदेह पाहिला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सुरुवातीला चौकशीदरम्यान लक्ष्मी सिंहने हत्येचा आरोप फेटाळला. पोलिसांनी कडकपणे चौकशी केली असता, शेजारी राहणाऱ्या सचिनशी अफेअर होतं, असं तिनं मान्य केले.

आरोपी महिलेनं सांगितलं की, ”गेल्या काही वर्षांपासून मी शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत रिलेशनमध्ये होते. आम्ही नेहमी एकमेकांना भेटायचो. सोमवारी पती कामानिमित्त बाहेर गेला असता, मी प्रियकराला घरी बोलावलं. सासूने आम्हाला संबंध ठेवताना पाहिलं. ही गोष्ट ती माझ्या पतीला सांगेल याची मला भीती वाटू लागली. त्यामुळे प्रियकराच्या मदतीने सासूची निर्घृण हत्या केली. तिच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला, त्यात तिचा मृत्यू झाला. मग आम्ही मृतदेह जंगलात फेकून दिला.” सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Comment