महायुतीचा मुख्यमंत्री ठरला, अमित शहांनी दिले मोठे संकेत….

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सांगलीत सभा पार पडली. यावेळी अमित शाह भाषणादरम्यान आगामी मुख्यमंत्रि‍पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दलचे संकेद दिले. तसेच महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार, याबद्दलही त्यांनी जाहीरपणे भाष्य केले.

महायुतीचा मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा कोण? 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची सातत्याने चर्चा सुरु आहे. त्यातच महायुती किंवा महाविकासआघाडी दोघांनीही अद्याप मुख्यमंत्रि‍पदासाठीचा चेहरा जाहीर केलेला नाही. नुकतीच सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा कोण असणार? याबद्दल भाष्य केले आहे.

महाराष्ट्रातील जनतेचीही हीच इच्छा 

“महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. प्रत्येक दिवशी आपण सर्वांनी निर्णायक भूमिका बजावली पाहिजे. मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आणायचं आहे. महाराष्ट्रातील जनतेचीही हीच इच्छा आहे”, असे अमित शाह यांनी म्हटले.

Leave a Comment