मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
कर्क : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
सिंह : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कन्या : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
तूळ : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मन आनंदी व आशावादी राहील.
वृश्चिक : काही कामे धाडसाने पार पाडाल. गुरुकृपा लाभेल.
धनू : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.
मकर : आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.
कुंभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.
मीन : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.
