आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

वृषभ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

मिथुन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

 

सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

कन्या : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

 

तूळ : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. संततिसौख्य लाभेल.

 

वृश्‍चिक : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

धनू : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

 

मकर : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

 

कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मीन : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावा.

Leave a Comment