पारनेर ब्रेकिंग! ‘या’ अपक्ष उमेदवाराने भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या कार्यालयाला दिली सदिच्छा भेट 

पारनेर (DSNews24/किरण पुरी) राज्यभरात विधानसभेची रणधुमाळी जोमात सुरू आहे. तसेच मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. प्रत्येक मतदारसंघात उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यातच पारनेर नगर मतदारसंघात पंचरंगी लढत होत असून नेमकं कोण बाजी मारणार हे २३ नोव्हेंबर रोजीच कळणार आहे. 

गेली 15 वर्षांपासून भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मग त्यामध्ये कांद्याचा प्रश्न, दूध दरवाढीचा प्रश्न, चारा छावण्या, शेतकरी कर्जमाफी, पारनेरच्या दुष्काळी गावांचा पाण्याचा प्रश्न अशा विविध शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा देत आहेत. तसेच अनेकदा त्यांनी आंदोलने मोर्चे काढत एक वेगळी ओळख निर्माण केली.

त्यामुळे पारनेरसह नगर जिल्ह्यात त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली आहे. त्यामुळे संतोष वाडेकर यांच्या पाठिमागे मोठा फौजफाटा असल्याने निवडणूकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान विधानसभेची रणधुमाळी सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांनी देसवडे येथील भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या संपर्क कार्यालयास नुकतीच सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संदेश कार्ले यांना पुढील वाटचालीस संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी संदेश कार्ले म्हणाले, तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेली अनेक वर्षांपासून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करत आहात. त्याच मुद्यांवर मी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करत निवडणूक लढवत आहे. त्यामुळे आपले विचार पुढे नेण्यासाठी निवडणुकीत सहभागी झाले पाहिजे असे मत यावेळी संदेश कार्ले यांनी व्यक्त केले.

यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष संजय भोर, चेअरमन संतोष टेकुडे, सुयोग टेकुडे,दत्ता वाडेकर, संतोष फटांगरे, तेजस फटांगरे, प्रवीण भोर, अक्षय टेकुडे, किरण फटांगरे, ग्रामपंचायत सदस्य तेजस भोर, मंज्याबापू वाडेकर, माजी चेअरमन संजय भोर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Comment