साकूर गटात बाळासाहेब थोरातांची ताकद वाढणार, अनेक जण….. 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून अमोल खताळ व महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात निवडणूकीच्या रिंगणात आमनेसामने उभे आहेत. तसेच दोन्ही बाजूने जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान साकूर गटात गेल्या काही वर्षांपासून कॉंग्रेसचे वर्चस्व आहे.

त्यामुळे या गटात विरोधकांचा कधीच टीकाव लागला नाही. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साकूर गटातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीलाच धक्का बसल्याची चर्चा संपुर्ण तालुक्यात रंगली होती.

मात्र काही कार्यकर्ते ठाकरे गटासह कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याची बातमी समोर आलीय. मात्र उघड नाही पण छुपा पाठिंबा कार्यकर्ते देणार असल्याने आता बाळासाहेब थोरातांची साकूर गटात आणखीन ताकद वाढणार आहे. त्यामुळे ऐनवेळी वारच फिरणार असल्याची शक्यता आहे. 

Leave a Comment