राज्यातील हवामान कोरडे आहे, पण गुरूवारपासून (दि.१४) पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.१५) सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
