नागपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री आणि नागपूर उत्तरचे उमेदवार नितीन राऊत थोडक्यात बचावले आहेत.
नितीन राऊत यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना बुधवारी रात्री उशीरा घडली. या अपघातामध्ये नितीन राऊत थोडक्यात बचवाले. त्यांना कोणतीही इजा अथवा दुखापत झालेली नाही. याप्रकऱणी पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नागपूरमधील ऑटोमोटिव्ह चौकात बुधवारी रात्री उशीरा एका ट्रकनं नितीन राऊत यांच्या गाडीला धडक मारली. या अपघातात नितीन राऊत थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला होता, या अपघातात राऊत यांच्या वाहनाचे थोडे नुकसान झालेय. अपघातात राऊत सुखरूप असून कपिल नगर पोलिसांनी यासंदर्भात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास केला जात आहे.
