बिग ब्रेकिंग! साकूर दरोडा प्रकरण, दोन दरोडेखोरांना कोर्टात हजर केले अन् 

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथे दोन दिवसांपूर्वी पाच दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत सोन्याच दूकानच लूटून नेल्याची घटना घडली होती. विशेषतः भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने साकूरमध्ये एकच खळबळ उडाली होती. तसेच हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.

या दरोडेखोरांनी दूकानाबाहेर येऊन हवेत फायरिंग करत तेथूनच पसार झाले होते. या दरोडेखोरांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह घारगाव पोलिसांच पथक रवाना झाले होते. अवघ्या काही तासांतच पाच दरोडेखोरांपैकी दोन दरोडेखोरांच्या पारनेरमधून मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आलं.

अक्षय बाळासो वावरे, वय 24 वर्षे, रा. माळेगांव, येळे ढाळे वस्ती, ता. बारामती जि. पुणे, स्वप्नील किशोर येळे, वय 22 वर्षे, रा. माळेगांव, येळे ढाळे वस्ती, ता. बारामती जि. पुणे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान या दोन आरोपींना संगमनेर येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना १८ नोव्हेंबर पर्यंत कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र उर्वरित ३ दरोडेखोर फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे.

Leave a Comment