बिग ब्रेकिंग! ठाकरे गटाला मोठा धक्का, “या” नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक आहे. बुधवारी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर शनिवारी २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक असातना शिवसेना उद्धव ठाकरे गटाला वाशिममध्ये मोठा धक्का बसला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजाभैय्या पवार आणि गजानन ठेंगडे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

वाशिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी असलेले राजाभैय्या पवार आणि युवासेनेचे जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यातील राजाभैय्या पवार यांनी आधीच बंडखोरी केली होती, ते वाशिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या दोन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा ऐन विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटालासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Leave a Comment