आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल

 

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील.

 

मिथुन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

कर्क : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

 

सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. सामाजिक जीवनात सहभागी व्हाल.

 

कन्या : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील.

 

तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

वृश्‍चिक : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

धनू : नवीन हितसंबंध निर्माण होतील. आपल्या मतांविषयी

 

आग्रही राहाल.

 

मकर : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

कुंभ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Leave a Comment