Sai Baba : रामनवमी उत्सवात साईबाबांच्या झोळीत रेकॉर्ड ब्रेक दान

Sai Baba :  देशाभरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल 112 वर्षांची परंपरा शिर्डीतील रामनवमी उत्सवाला असल्यानं इथेही रामनवमी मोठ्या श्रद्धेनं आणि उत्साहात साजरी केली गेली.

तीन दिवसीय रामनवमी उत्सवात आलेल्या भाविकांनी साई चरणी भरभरून दान केले. 29 मार्च ते 31 मार्च दरम्यान तब्बल दोन लाख भाविकांनी साई समाधीच दर्शन घेतलं.

तर बाबांच्या झोळीत 4 कोटी 09 लाख रुपयांचं दान भक्तांनी केलं. यात दानपेटी, ऑनलाईन, डीडी, मनीऑर्डर आणि सोने चांदीचा समावेश आहे. तीन दिवसात सुमारे 1 लाख 90 हजार भाविकांनी प्रसादलायत भोजनाचा लाभ घेतला.

Leave a Comment