Weather Update : यंदाचा उन्हाळा कडक ; हवामान विभागाने दिला अलर्ट

Weather Update : फेब्रवारी महिन्याच्या अखेरच्या काही दिवसांत पावसांच्या सरी कोसळल्याने देशातील काही भागातील वातावरण थंड आहे. परंतु पुढील काही दिवसांमध्ये तापमानात हळू-हळू वाढ होणार आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना एप्रिल ते जून महिन्यात उन्हाच्या कडक झळा सोसाव्या लागणार आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उत्तर पश्चिम भारतातील काही भाग सोडला तर देशातील काही भागात एप्रिल ते जून महिन्यात तापमान हे सामन्य तापामानापेक्षा अधिक असणार आहे.

याचदरम्यान, उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व राज्यात उष्णतेची लाट देखील येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तीन आणि चार एप्रिलला उत्तर पश्चिम भारतात विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एप्रिल महिन्यापासून उष्णतेची लाट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये एप्रिलमध्ये सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमानाची उष्णतेची लाट सुरू होणार आहे. कमाल तापमानाहून ४.५ डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक तापमानाची उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment