महाराष्ट्रातील कर्जत जामखेड मतदारसंघावरील निवडणूक शेवटपर्यंत रंजक राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) रोहित राजेंद्र पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. पण अखेरच्या ईव्हीएममध्ये रोहित पवार यांची लीड वाढली आणि त्यांना विजयी घोषित करण्यात आलं.
रोहित पवार यांचा 1243 मतांनी विजय झाला. त्यांना एकूण 1,27,676 मते मिळाली, तर राम शिंदे यांना 1,26,433 मते मिळाली. या जागेसाठी एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. NOTA ला 601 मते पडली. 2019 च्या निवडणुकीत रोहित पवार पहिल्यांदा विजयी झाले होते. त्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार आणि कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता.
