बिग ब्रेकिंग! निवडणूकीच्या वादातून गोळीबार, नगर जिल्ह्यात खळबळ 

निवडणूकीच्या वादातून राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज रविवार दि. 24 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.

या बाबत समजलेली माहिती अशी, आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भाऊसाहेब शिवाजी नवले व संजय शिवाजी नवले हे दोघे गुंजाळे बसस्थानकासमोर असणार्‍या किराणा दुकानाजवळ उभे होते. यावेळी बाबा चेंडवाल, सोना चेंडवाल, संदीप चेंडवाल, अविनाश चेंडवाल यांनी येऊन संजय नवले व भाऊसाहेब नवले यांना शिवीगाळ करत दमदाटी केली.

याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर त्यांच्याकडे असणार्‍या गावठी कट्ट्यातून भाऊसाहेब नवले यांच्यावर गोळी झाडली. ती गोळी त्यांच्या पायाच्या गुडघ्याला लागली. व संजय नवले यांच्याव कुर्‍हाडीने हल्ला करून डोक्यात कुर्‍हाडीचा घाव घातला. या घटनेनंतर हल्लेखोर तेथून पसार झाले असल्याची माहिती जखमींनी दिली.

तसेच काल विधानसभेच्या निकालानंतर रात्री हल्लेखोरांनी नवले यांना फोनवर शिवीगाळ करीत दमदाटी व तुझा बेत बघतो अशी धमकी दिली होती. असेही त्यांनी सांगीतले. दरम्यान, स्थानिकांनी तातडीने जखमी नवले यांना नगर येथे तातडीने उपचारासाठी नेण्यात आले

Leave a Comment